Loading...

“Pradeep Dhekale, Librarian of Kamala Nimkar Bal Bhavan School in Phaltan has shared his experience of getting children to write . He got students from grade 3 to write in response to interesting photos in the newspaper as a trigger, igniting desire to become writers, by engaging with their writing process, sharing of writing in the classroom as well as displaying it on the board for it to be read by other children. In the process, the blog captures role of an library educator who actively plans and draws children in the process of sense making and expression”

Pradeep Dhekale (Librarian)

Kamala Nimbkar Bal Bhavan School (Phaltan)

बाल लेखक

मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या. आता शाळा सुरु होणार. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता ३ री चा तास होता. त्यासाठी काहीतरी नवीन करून घेतले पाहिजे होते. जेणे करून मुले त्यात रमणार होती. मग मी ४ /५ दिवसात वर्तमानपत्रातील मला जी चित्र आवडतील व त्या चित्रावरून मुलांना काही लिहिता येईल अशी चित्रे गोळा करण्यास सुरवात केली. ती चित्रे मी एका फुलस्केप पेपरवर चिकटवली. आता माझी पहिल्या दिवसाची तयारी झाली ह्याचा मलाच आनंद झाला.

मी सुरवातीला विचारले “कोणाला लेखक होण्यास आवडेल.” सगळ्यांनी झटकन हात वर केले. मग मी मुलांना ते फुलस्केप पेपर वाटले. मुलांनी काय करायचे ते समजावून संगीतले.

मुलांनी पेपर हातात पडताच लिहीण्यास सुरवात केली. काही मुले चित्रात रमून गेली. माझ्या लक्षात असे आले की ज्ञानेश्वरीला  जे चित्र मिळाले होते त्या चित्रात एक इमारत होती  जिचे प्रतिबिंब  पाण्यात पडलेले होते व ती इमारत पाण्यात उलटी दिसत होती. मी तिला विचारले “तू इमारत पडल्याचे का लिहिले आहेस ?” ती पटकन म्हणाली “ सर… आम्ही बारामतीला जाताना डोळ्यासमोर प्रत्यक्ष इमारत पडताना बघितली आणि ह्या चित्रात देखील इमारत उलटी म्हणजे पडल्यासारखीच वाटत आहे,”

काही मुलांनी त्यावरून कविता लिहिल्या, त्या आम्ही तासाला वाचून घेतल्या. काही बोर्डवर लावल्या. मुले येता जाता वर्णन वाचत होती. त्यातील लेख जोडला आहे.

पत्र संवाद

Vidya Kakade, Library Educator in Kamala Nimbkar Bal Bhavan School encouraged grade 6 students communicate with their favourite author through letter writing…

Niju Mohan Library Educator's Course 7 Sep 2014

The Leading Reading Schools of India Awards 2015

The Leading Reading Schools of India Award is an annual award established by Young India Books – India’s foremost review site of children’s books; to recognize and honour the five leading schools of the country;..

Niju Mohan Library Educator's Course 13 Aug 2014