Loading...

Written by : Vidyadevi, PSS

जुलै महिन्यात मी “हॅनाची सुटकेस” पुस्तक वाचले. हे पुस्तक चांगले आहे हे खूप लोकांकडून एकले होते.

दोन दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झाले.हे पुस्तक उत्कंठावर्धक तर आहेच.तसेच एक लहान मुलगी कथेतील मुख्य पात्र आहे.मुलांचे भावविश्व अतिशय सुंदर रेखाटले आहे. आनंद, दु:ख, भीती, द्वेष, करुणा, सहानुभूती, सहकार्य, आदी कितीतरी भावनांमधून वाचक देखिल या पुस्तकाद्वारे प्रवास करतो. शेवटी शांतता व प्रेमाचा संदेश देणारी फ्युमिकोची कविता मन हेलावून टाकते. हे पुस्तक कथा आपल्यापर्यंत पोहचू शकण्याचे कारण म्हणजे फ्युमिकोची जिद्द ,चिकाटी होय.

हे पुस्तक इयत्ता ६ वी च्या विधार्थ्यांना वाचून दाखवण्याचे ठरवले. पहिल्याच तासाला मुलांना जगाचा नकाशात जपान व चेकोस्लोव्हाकिया हे देश दाखविण्यास सांगितले.नंतर जपान मधील फ्युमिको काय काम करते.त्यांच्या संस्थेत हॅनाची सुट्केस कशी येते.त्या सुटकेस विषयी “स्मॉल विंग्स’ मधील मुलांच्याही मनात कुतुहल निर्माण होते.हॅनाची ,सुट्केसची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते.

पहिल्याच प्रकरणाचे प्रकट वाचन करताना छलछावणी, दुसरे महायुद्ध, नाझी, हिटलर, ज्यू ,आदी शब्दांचा अर्थ मुलांना सविस्तर सांगावा लागला. हिटलरची आत्मचरित्र असलेली पुस्तके मुलांना दाखवली.मुलांनी अनेक प्रश्न विचारले.हिटलर असे का वागत होता ? युद्ध का झाले ? ,इ. यावर अधिक चर्चा न करता कथा पुढे वाचण्यास सुरवात केली.{कौस्तुभ म्हणाला,माझ्या ग्री हिटलरच्या कडी आहेत ,त्या पाहायला आणू का?}

हॅनाचा सुरवातीचा काळ सुखाचा होता.तो वाचताना मुले आनंदात होती.जसजसे युद्धाची चाहूल, बातम्या,ज्यू लोकांवरची बंधने, हॅना-जॉर्ज यांची शाळा बंद झाली. हॅना जॉर्ज अस्वस्थ मनस्थितीत होते.त्यांनी आपले विचार, भावना, इच्छा एका कागदावर लिहून काढले वएका बाटलीत भरून ती बाटली घराच्या बागेत खड्डा खणून ती बाटली पुरली. हा प्रसंग मुळे गहिवरून एकत होती.हॅना-जॉर्जचे दु:ख मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

पुढच्या प्रत्येक तासाला मुले पटकन बसून आतुरतेने ‘ताई पुढची गोष्ट वाचा.’ म्हणू लागले. मुळे कथेत रमली होती.काहींनी ते पुस्तक नावावर दयावे,अशी मागणी केली. दोन विधार्थीनिंनी पुढचा तास येईपर्यंत ते पुस्तक पूर्ण वाचले.गायत्रीने हे पुस्त्ल आधी वाचलेले होते, तरी ती तितक्याच तन्मयतेने गोष्ट एकत असे.

हॅना-जॉर्जची पुढे झालेली हालअपेष्टा एकून मुलांनाही वाईट वाटत होते. प्रसंग वाचताना मीही मुलांशी चर्चा कृ शकले नाही.शेवटी मात्र जेव्हा फ्युमिको जॉर्जला जपानला बोलावते. जो कार्यक्रम करते,त्याचे वर्णन एकने मुलांना आवडले.

मुलांना या पुस्तकातील जो प्रसंग सर्वात जास्त लक्षात रहिला त्याचे चित्र काढण्यास सांगितले. यात मुलांनी य्धाच्या बातम्या चोरून अएक्ताना मुले ,छळछावणीतील जॉर्ज आणि हॉनाची भेट, छळछावणीतील गुपचूप चाललेला चित्रकलेचा तास, हॅना जॉर्जने आपल्या इच्छा बाटलीबंद करून बागेत पुरतनाचे चित्र, फुमिको मुलांबरोबर बोलताना असे प्रसंग रेखाटले.

शेवटी युध्द कशामुळे होत असेल?, तुम्हाला केव्हा केव्हा रंग येतो?, तुम्ही त्यावर काय शांततेचे मार्ग सुचवलं? ,इ. चर्चा केली.मुलांनी सांगितलेली करणे-लं भावाची चूक असूनही मलाच ओरडतात,एखाद्याला ज्यादा वाटणी एखाद्याला कमी, एखाद्याला पुन्हा पुन्हा संधी, चिडवणे,इ. मुलांनी रंग नियंत्रित करण्याचे शांतता मार्ग देखिल सांगितले.

Image courtesy: savingforsomeday.com